भुजबळांच्या आगमनावेळी नेमकं काय घडलं…

नाशिक । राज्याचे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रीमंडळात सदस्याची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी क्रेनच्या सहाय्याने ६० फूटी पुष्पहार घालत, ढोल ताशांच्या गजरात व भव्य अतिषबाजीने शाल-फेटा देत युवक पदाधिकार्‍यांसह त्यांचे जंगी स्वागत केले.

छगन भुजबळ राज्याचे मंत्री झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. राजभवनात शपथविधी पार पडल्यानंतर भुजबळ यांच्या नाशिक दौर्‍यावर सर्वांचे लक्ष होते. भुजबळ हे आपल्या कर्मभूमीत येत आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांसह समर्थकांना त्यांच्या आगमनाची प्रतीक्षा असल्याने भुजबळांचे स्वागतासाठी समर्थकांसह कार्यकर्त्यांनी मोठी जय्यत तयारी केली होती.

राष्ट्रवादी भवन येथे भुजबळांचे आगमन होताच भुजबळांचे निकटवर्तीय अंबादास खैरे यांनी ६० फूटी पुष्पहाराने सर्वांचे लक्ष वेधले होते. यानंतर मंत्री भुजबळ यांचे ढोल व फटाक्यांच्या आतिषबाजीने जंगी स्वागत करण्यात आले. स्वागतावेळी राष्ट्रवादी भवन येथे भव्य रांगोळी ही काढण्यात आली होती.

यावेळी समर्थकांनी नाशिककरांच्या मनामनात पालकमंत्री भुजबळ साहेब अशा आशयाचे फलक झळकावले. ज्यावेळी भुजबळ भाषणासाठी उभे राहीले त्यावेळीही ‘एकच पर्व ओबीसी सर्व’, पालकमंत्री, पालकमंत्री अशी जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे भुजबळांनीही दोन मिनिटे थांबून सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले.

यावेळी संदिप गांगुर्डे, शशी हिरवे, व्यंकटेश जाधव, विशाल डोके, संदिप खैरे, हर्षल चव्हाण, संतोष भुजबळ, डॉ. संदिप चव्हाण, निलेश भंदुरे, निलेश जाधव, महेश बाळसराफ, भूषण गायकवाड, राहुल पाठक, रेहान शेख, रविंद्र शिंदे, कुलदीप जेजूरकर आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्तेउपस्थितहोते.

error: Content is protected !!