नाशिक हनी ट्रॅप प्रकरणी मोठा खुलासा

मुंबई : राज्यात सध्या नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या हनी ट्रॅप प्रकरणावरून मोठा राजकीय वादंग निर्माण झाला आहे. या प्रकरणात अनेक आजी-माजी अधिकारी, तसेच काही राजकीय नेते अडकले असल्याची चर्चा सुरू आहे. विधानसभेत यावर तीव्र चर्चा होत असून, विरोधकांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

“ना हनी आहे ना ट्रॅप” – मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान

विधानसभेत उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाला फारसे महत्त्व देण्यास नकार दिला. “या प्रकरणात ना हनी आहे, ना ट्रॅप,” असे म्हणत त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले. तसेच, कोणत्याही आजी-माजी मंत्र्याने हनी ट्रॅपसंदर्भात तक्रार केलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

वडेट्टीवारांचा मोठा दावा

दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा गौप्यस्फोट करत सांगितले की, “या प्रकरणाची एक महत्त्वाची सीडी आमच्याकडे आहे.” त्यांनी असा दावाही केला की याआधी सत्तांतर घडवून आणण्यात अशाच प्रकारच्या माहितीचा उपयोग झाला होता. “ही माहिती इतकी संवेदनशील आहे की ती सार्वजनिक करण्यासाठी तिकीट लावावं लागेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री सत्य लपवत आहेत का?

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले. त्यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह दाखवल्याचा उल्लेख करत सांगितले की, “त्यामध्ये महत्त्वाची माहिती असून ती उघड केल्यास अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होऊ शकतात.” तसेच, “मुख्यमंत्री सत्य लपवत आहेत का? आणि त्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान होत आहे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

हनी ट्रॅपमुळे राज्याच्या सुरक्षेला धोका?

विरोधकांच्या म्हणण्यानुसार, या हनी ट्रॅप प्रकरणामुळे काही महत्त्वाचे दस्तऐवज असामाजिक घटकांच्या हाती लागल्याचा संशय आहे. यामुळे राज्याच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याबाबत गंभीरपणे चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

error: Content is protected !!