नाशिक : शहराला दिवसभर अवकाळी पावसाने झुडपून काढल्यानंतर सायंकाळच्या सुमारास त्रंबकेश्वर शहरांमध्ये देखील जोरदार वाऱ्यासह हजेरी लावली. ज्या पद्धतीने नाशिक शहरातील रस्ते पाण्याने ओसंडून वाहत होते.

त्याच पद्धतीने त्र्यंबकेश्वर शहरातील रस्त्यांनाही नदी नाल्याचा रूप आलं होतं. शहरात दिवसभर 21 मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर दोन तरुणांचा या पावसामुळे मृत्यू झाल्याची घटना देखील घडली आहे. सुदैवाने त्रंबकेश्वर शहरांमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी नागरिकांची प्रचंड अशी गैरसोय झाली.

त्याचबरोबर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मधील मान्सूनपूर्व कामाची पोलखोल देखील झाली. दरवर्षी पावसाळ्यामध्ये जसं रस्त्यांवरनं पाणी वाहतं तसं मे महिन्यामध्ये पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला आहे त्याचबरोबर मान्सूनपूर्व नाल्यांची साफसफाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे









