नवी दिल्ली । केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला असून यंदाही महाराष्ट्रातील उमेदवारांनी झळाळती कामगिरी करत राज्याची शान उंचावली आहे. देशात पहिला क्रमांक शक्ति दुबे याने पटकावला असून हर्षिता गोयल दुसरी, तर अर्चित डोंगरे याने तिसरा क्रमांक मिळवत देशभरात बाजी मारली आहे. विशेष म्हणजे अर्चित हा पुण्याचा रहिवासी असून, महाराष्ट्रात तो पहिला आला आहे.
मराठमोळ्या उमेदवारांची घवघवीत कामगिरी
यंदाच्या निकालात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील उमेदवारांनी यश मिळवले आहे. ठाण्यातील तेजस्वी देशपांडे हिने 99 वा क्रमांक पटकावला असून अंकिता पाटील हिला 303 वा क्रमांक मिळाला आहे. मुलींनी यंदाही लक्षणीय यश मिळवून आपली मेहनत सिद्ध केली आहे.
अर्चित डोंगरेचे यश महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी
पुण्याचा अर्चित डोंगरे याचे यश महाराष्ट्रासाठी अत्यंत गौरवाचे असून त्याने देशात तिसरा क्रमांक मिळवून राज्याच्या आणि पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. अर्चितने आपल्या अभ्यासूवृत्ती आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे हे यश संपादन केले.
येथे तपासा निकाल
UPSC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या – www.upsc.gov.in
होमपेजवर ‘UPSC Civil Services Final Result 2024’ या लिंकवर क्लिक करा
नवीन PDF फाईल उघडेल
त्यामध्ये उमेदवारांनी आपला Roll Number तपासावा
फाईल डाउनलोड करून हार्ड कॉपी ठेवा










