नाशिक : नाशिक जिल्ह्यात आज दुपारनंतर विविध तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला. काही भागांत जोरदार पावसासह गारपिटीचीही नोंद झाली. यामुळे शेती, घरे, अंगणवाडी केंद्रे आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्हाभरातून प्राथमिक अहवाल प्राप्त झाले असून नुकसानग्रस्त भागांत पंचनाम्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
प्रभावित तालुके आणि नुकसान:
सुरगाणा तालुका:
गट क्र. 17, मौजे चिंचले येथील मंगळू पाडवी व नरेश पाडवी यांच्या घरांचे नुकसान
मौजे वाघदोंड येथील अंगणवाडी केंद्राचे छप्पर उडाले
मौजे कोंढार, नांदुर पारेकरवाडी येथील श्री. कोंडीराम पवार यांची झोपडी कोसळली
विविध ठिकाणी वादळामुळे फळझाडांचे आणि शेती पिकांचे मोठे नुकसान
निफाड तालुका: मौजे पाचोरे खुर्द येथील धोंडीराम वाळुबा आंधळे यांची म्हैस वीज पडून मृत्यूमुखी
पेठ, त्र्यंबक, कळवण, नांदगाव, बागलाण, येवला, मालेगाव आणि चांदवड तालुक्यांमध्ये अनेक भागांत वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. चांदवडमध्ये गारपिटीसह जोरदार पावसाची नोंद
नुकसान झालेल्या नागरिकांनी स्थानिक महसूल किंवा कृषी कार्यालयात संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नाशिक शहरातील अनेक भागात सायंकाळच्या सुमारास सोसाट यांच्या वारासह मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे शहराच्या विविध भागांमध्ये झाडे पडून अनेक भागात वीज पुरवठा देखील खंडित झाला










