Unseasonal Rainstorm: सिन्नर, येवल्यात अवकाळीचा तडाखा, १३ हेक्टरचे नुकसान.

नाशिक । गेल्या दोन दिवसांपासून सिन्नर, निफाड, येवला आणि नाशिक या तालूक्यांमध्ये वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी गारपिटदेखील झाली असून त्यामुळे शेतीपिकांना फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानूसार गेल्या दोन दिवसांत अवकाळीने १३ हेक्टरवरील कांदा व भाजीपाल्याचे हानी झाल्याचा अंदाज आहे.

जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये मागील तीन दिवसांपासून ढगाळ हवामानासोबत अवकाळी पाऊस व गारपीट झाली. अवघ्या २० ते २५ मिनिटांचा पाऊस झाला असला तरी त्याचा वेग अधिक होता. परिणामी शेतीपिकांना त्याचा फटका बसला आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा व भाजीपाला पाण्याने भिजला.

तसेच अखेरच्या टप्यातील द्राक्षबागा, कांदापिक, भाजीपाला, गहू व मक्यालाही सिन्नर तालुक्यातील नांदुरशिंगोटे, सिन्नर व वावी मंडळात शनिवारी (ता.१२) झालेल्या पावसामुळे १० हेक्टर वरील कांदा तसेच ३ हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले. एकुण २९ शेतकरी बाधित झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील अन्यही तालुक्यात तीन दिवसांमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. त्यामुळे पिकांच्या नुकसानीचे आकडे वाढतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे

error: Content is protected !!