भारतात अ‍ॅपचा कारखाना नको : ट्रम्प यांचा भारताला विरोध

वॉशिंग्टन । अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जागतिक तंत्रज्ञान उद्योगावर प्रभाव टाकणारा वक्तव्य करून खळबळ माजवली आहे. अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांना उद्देशून त्यांनी भारतात अ‍ॅपलचा उत्पादन कारखाना सुरू करू नये, असा सल्ला दिला आहे. अमेरिकेतील रोजगारांचे संरक्षण करणे आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे, हीच अमेरिकेची खरी गरज असल्याचे ट्रम्प यांनी ठामपणे नमूद केले.

ट्रम्प यांनी म्हटले की, “अ‍ॅपलसारख्या मोठ्या अमेरिकन कंपन्यांनी भारतासारख्या परदेशी देशांमध्ये कारखाने उभारण्याऐवजी अमेरिकेतच गुंतवणूक करावी. यामुळे आमच्या तरुणांना नोकर्‍या मिळतील आणि अमेरिकेची औद्योगिक ताकद वाढेल.

भारत सरकारने अलीकडेच अ‍ॅपलला मोठ्या प्रमाणात उत्पादन सुविधा आणि कर सवलती देऊन गुंतवणुकीसाठी आमंत्रित केले आहे. त्यामुळे अ‍ॅपलने भारतात आयफोन उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, ट्रम्प यांना ही गोष्ट पटलेली नाही. त्यांच्या मते, परदेशी उत्पादनावर अवलंबून राहणे हे अमेरिका आणि तिच्या कामगारांसाठी घातक आहे.

या वक्तव्यावर अद्याप अ‍ॅपलकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक विश्लेषकांच्या मते, ट्रम्प यांच्या या विधानाचा अ‍ॅपलच्या जागतिक धोरणांवर फारसा परिणाम होणार नाही. भारत हा अ‍ॅपलसाठी एक उदयोन्मुख बाजार असून, उत्पादन खर्च कमी राखण्यासाठी भारतातील गुंतवणूक ही अ‍ॅपलच्या दीर्घकालीन योजनेचा भाग आहे.

error: Content is protected !!