मुंबई । संपूर्ण जग हादरवणार्या अहमदाबाद विमान दुर्घटनेत अपघाताचा व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमुळे हा अपघात कसा घडला हे समोर आले. परंतू याच विमानाचा व्हिडीओ कसा समोर आला ? कोणी याचे चित्रण केले ? नेमकं अपघाताच्यावेळी अचूक टायमिंग कसे साधले ? याविषयी सोशल मिडीयावर विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. आता हा व्हिडीओ चित्रित करणारा युवक समोर आला असून पोलीसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
व्हिडीओ रेकार्ड करणार्याचे नाव आहे आर्यन, आर्यन आपल्या गावावरून अहमदाबादमध्ये नातेवाईकांच्या घरी आला होता. तो १७ वर्षांचा असून इयत्ता १२ वीमध्ये शिक्षण घेतो. त्याच्या नातेवाईकांचे घर विमानतळाला लागूनच आहे. आर्यनने आयुष्यात प्रथमच विमान इतक्या जवळून बघितले. त्यामुळे आपल्या गावातील मित्रांनाही विमान दाखवावे म्हणून उत्सुकतेपोटी तो या विमानाचे व्हिडीओ रेकॉर्ड करत होता असे त्याने सांगितले.
आर्यनच्या बहिणीने सांगितले, आर्यन उत्सुकतेपोटी व्हिडीओ काढत होता. परंतू जसा स्फोट झाला तो घाबरला आणि त्याने व्हिडीओ बंद केला. विमान आकाशात उडतांना पाहून त्याला कुतूहुल वाटत होते. मीही एक दिवस विमानात बसेल, अशी स्वप्न तो पाहता होता. मात्र जेव्हापासून विमानाचा स्फोट होतांना त्याने पाहिले तेव्हापासून मी विमानात कधीही बसणार नाही असे तो म्हणत आहे.
या व्हिडीओमुळे आर्यनला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आसून त्याच्या व्हिडीओ रेकॉर्ड करण्याच्या कारणाचा तपास घेतला जाणार असल्याचे सांगितले जाते.











