शासनच भिकारी, शेतकरी नाही – कोकाटेंचे विधान

नाशिक । शेतकर्‍यांकडून एक रुपया शासन घेते, पण शासन शेतकर्‍यांना तो एक रुपयाही देत नाही. म्हणजे भिकारी कोण? शासनच! शेतकरी नव्हे,असे विधान राज्याचे कृषीमंत्री माणिकराव काकाटे यांनी केले. एक रुपयात पीक विमा योजना आणली, परंतु काही लोकांनी त्याचा गैरवापर केला, असे वक्तव्य काही महिन्यांपूर्वी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले होते. कोकाटे यांच्या वक्तव्यावर शेतकर्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तर विरोधकांकडून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली यावर काकाटे यांनी स्पष्टीकरण दिले.

५ लाखांहून अधिक बोगस अर्ज उघड
माझ्या कार्यकाळात पाच ते साडेपाच लाख बोगस अर्ज सापडले. केवळ एक रुपया भरायला लावल्यामुळे हे उघड झाले. मी हे अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्या घोषणा केल्या, असं सांगत त्यांनी आपल्या कार्यक्षमतेवर भर दिला.

५२ जीआरकाढले
आजपर्यंत मी कृषी खात्याच्या माध्यमातून ५२ शासकीय निर्णय (जीआर) काढले आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपर्‍यात मी पोहोचलो आहे – शेतावर, बांधावर, संशोधन केंद्रांवर. जिथे सुविधा नाहीत, तिथे देण्याचं आश्वासन दिलं आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

इतर कृषी मंत्र्यांना टोला
आजवर एकही कृषी मंत्री संशोधन केंद्रावर गेला नव्हता. मी मात्र विद्यापीठे, संशोधन केंद्रं आणि थेट शेतकरी यांच्याशी संवाद साधला आहे, असं सांगून त्यांनी मागील मंत्र्यांच्या निष्क्रियतेवर अप्रत्यक्ष टोला लगावला.

हवामान केंद्रांची गरज आणि कृषी खात्याचा सन्मान
प्रत्येक गावामध्ये हवामान केंद्र असावं, ही माझी मागणी आहे. गेल्या सहा महिन्यांत कृषी खात्यात मोठा बदल घडून आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या योजनेत कृषी खात्याला तिसरा क्रमांक मिळालाय. मग हे मी उगाच करतोय का? अशा शब्दांत त्यांनी आपल्या कार्यक्षमतेचं समर्थन केलं.

error: Content is protected !!