नाशिक – काठे गल्ली परिसरात वादग्रस्त धार्मिक स्थळ काढून घेण्यावरून झालेल्या तणावानंतर पोलिसांनी दंगेखोरांची धरपकड सुरू केली. आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेण्यात आल आहे. तर 70 वाहन ताब्यात घेण्यात आली आहे.
हे अतिक्रमण काढण्याबाबत धर्मगुरूंनी दाखवली मात्र तत्पूर्वीच हे अतिक्रमण काढून घेण्यात आल्याचे अफवा पसरल्याने मंगळवारी रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर जमावाने अचानक दगडफेक सुरू केली. या हल्ल्यात 20हुन अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले. एका पोलीस कर्मचाऱ्याचा पाय फ्रॅक्चर झाला.
या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी रात्रीच्या वेळी ५०० कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला होता. मात्र जमावाची संख्या ४०० च्या वर गेल्याने तणाव अधिक वाढला. पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली असून, परिसरातील वाहतूक मार्गांमध्येही बदल करण्यात आले आहेत.
दरम्यान, शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देत जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची भेट घेत विचारणा केली. यावेळी बोलताना दादा भुसे म्हणाले की आत्तापर्यंत या प्रकरणांमध्ये 70 वाहन जप्त करण्यात आलेली आहेत तर 15 जणांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेला आहे दंगेखोरांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे त्याचप्रमाणे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर सर्व खर्च हा शासकीय खर्चातून केला जाईल.
खाजगी रुग्णालयात जरी उपचार घेण्याची आवश्यकता भासली तरी शासकीय खर्चातूनच हे उपचार केले जातील असे दादा भुसे यांनी यावेळी जाहीर केले या घटनेच्या पाठीमागे कोणाचा हात होता याची सखोल चौकशी करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले आहे.
नाशिकमध्ये शांतता राखावी, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे







