नाशिक | श्री श्याम सेवक मंडळ ट्रस्ट, नाशिक यांच्या वतीने झुला महोत्सव व श्री श्याम भजन संध्या या भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमात भाविकांनी सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन ट्रस्टद्वारे करण्यात आले.
गंगापूर रोडवरील श्री बालाजी हॉल येथे रविवारी (दि.१३) झुला महोत्सव व श्री श्याम भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४.३० वाजता श्रींच्या ज्योतीचे प्रज्वलन होणार असून, त्यानंतर भजनांचा अखंड भजनाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ९.०० वाजता करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात शामबाबांच्या मखराची विशेष आकर्षक श्रृंगार सजावट करण्यात येणार आहे. श्री श्याम प्रभूंच्या भक्तिरसपूर्ण भजन गाण्यासाठी साकेत बोरोलिया (मुंबई), राकेश बावलिया (मुंबई), प्रदीप बगड़िया (मुंबई), बिनीता सुशील बजोरिया (मुंबई), सुरेश पारीक (नाशिक) हे कलाकार सेवा प्रदान करणार आहे. त्यांना “गणेश म्युझिकल ग्रुप” चा साजसंगत साथ लाभणार आहे.
या भक्तिमय संध्येला श्री श्याम सेवक मंडळ ट्रस्ट, नाशिक आणि श्री श्याम सेवा केंद्र, मुंबई यांच्यातर्फे परिश्रम घेतले जात आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री श्याम प्रभूंच्या भजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.









