CM Devendra Fadanvis : मी भुजबळांच्या बाजूने बोलू का ? अस का म्हणाले फडणवीस

नाशिक : नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटू शकला नसताना आज मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे, गिरीश महाजन एकाच व्यासपीठावर आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टिप्पणीने सर्वांच्या भुवया उंचावल्या.

नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही. पालकमंत्री पदासाठी भाजपकडून मंत्री गिरीश महाजन, शिंदे गटाकडून दादा भुसे यांची नावे चर्चेत आहेत.मात्र जिल्ह्यात सात आमदार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी पालकमंत्री पद राष्ट्रवादीला मिळावा असा आग्रह धरला आहे. त्यामुळं आज नाशिक येथे आयोजित CRPI लॅब च्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

व्यासपीठावर फडणवीस जिथे बसले होते त्यांच्या डाव्या बाजूला भुजबळ बसले होते तर उजव्या बाजूला दादा भुसे. फडणवीस जेव्हा भाषणासाठी उभे राहिले तेव्हा वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनने फडणवीस यांना त्यांच्या डाव्या बाजूच्या पोडियम जवळ उभे राहून बोलण्यास सांगितले.

कॅमेरामन ना सोयीचे व्हावे या करता फडणवीसांनी सहमती दर्शवत ते उजव्या बाजूने म्हणजे दादा भुसे बसले होते त्या बाजूने डाव्या बाजूला म्हणजे भुजबळ बसले होते त्या दिशेने येऊन बोलण्यास सुरवात केली.

यावेळी फडणवीस यांनी मी भुजबळांच्या बाजूने बोलाव असं तुमचं म्हणणं आहे का अशी मिश्किल टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला

error: Content is protected !!