नाशिक,– बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने वणी येथील प्रसिद्ध सप्तशृंगी देवीच्या मंदिरात दर्शन घेतले. श्रद्धेने भरलेल्या वातावरणात शिल्पा देवी चरणी लीन झाली होती. तिने देवीच्या चरणी नतमस्तक होत आपल्या आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली.
देवीच्या दर्शनासाठी ती सकाळच्या सुमारास मंदिरात पोहोचली. मंदिर प्रशासनाने शिल्पाला विशेष पूजेसाठी मार्गदर्शन केले. शिल्पाने पारंपरिक पोशाख परिधान करून देवीची पूजा केली.
मंदिरात दर्शनानंतर शिल्पा शेट्टीने संवाद साधताना सांगितले, “सप्तशृंगी देवी हे माझं श्रद्धास्थान आहे. इथे आलं की एक वेगळीच ऊर्जा आणि शांतता अनुभवायला मिळते. आज देवीच्या दर्शनाने मनाला खूप समाधान मिळालं.”
शिल्पा शेट्टीच्या या भेटीमुळे मंदिर परिसरात चाहत्यांची गर्दी उसळली होती. अभिनेत्रीनेही चाहत्यांसोबत प्रेमाने संवाद साधला.
तिच्या या धार्मिक भेटीमुळे तिच्या अध्यात्मिक बाजूचेही दर्शन झाले असून, तिच्या या भक्तिभावाची सोशल मीडियावरही सध्या चर्चा रंगली आहे.











