SBI गृह कर्जदारांना बँकेचे मोठे गिफ्ट !

तुमचं अकाऊंट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एसबीआयने आपल्या ग्राहकांना गृह कर्ज आणि वाहन कर्जावर मोठ्या सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक । स्टेट बँक ऑफ इंडियाने बँकेच्या गृहकर्जदारांना मोठे गिफ्ट दिले आहे. बँकेने गृहकर्जावरचे व्याजदर कमी करत दिलासा दिला आहे. त्यामुळे आता बँकेने हा व्याज दर ८.५० टक्क्यांवरून ८.२५ टक्के करण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या धोरण बैठकीत रेपो दर २५ बेसिस पॉइंटसने कमी करून ६ टक्के केला होता. त्यामुळे दोन महिन्यांत एकूण ५० बेसिस पाँइटसची कपात झाली आहे. यामुळे गृहकर्जावरील व्याजदर कमी होणार आहे.

बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदर कमी केल्याने मुदत ठेवींवर परिणाम होणार आहे. एसबीआयने गृहकर्ज, वाहन कर्ज, आणि वैयक्तिक कर्ज यावरच्या व्याजदरांमध्ये कपात केली आहे. त्यामुळे या तिनही प्रकारांच्या कर्जांवरचे हप्ते कमी होणार आहे.

मुदत ठेवींवरील व्याजदर घटवले

बँकेने मुदत ठेवींवर एक ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर आता ६.७ टक्के व्याजदर मिळेल. दोन ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर व्याजदर ७ टक्क्यांवरून ६.९ टक्के केला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी एक ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर ७.२ टक्के आणि दोन ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर ७.४ टक्के व्याजदर देत आहे.

error: Content is protected !!