नाशिक । बीडचे निलंबित पोलीस निरीक्षक रणजीत कासले यांनी आपल्याला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर देण्यात आली होती, असा दावा केला. याबाबत बोलतांना संजय राऊत यांनी वाल्मिक कराडचा वापर करून एन्काउंटर करण्याचा प्लॅन होता का असा सवाल उपस्थित करत याप्रकरणाची चौकशी होणे गरजेचे असल्याचे सांगितले. जर निलंबित पोलीस अधिकारी याबाबत सांगत असतील की, मी अशा प्रकारची नोंद पोलीस डायरीत केली आहे तर ते अधिक गंभीर असल्याचे ते म्हणाले.
नाशिक येथे शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत हे नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. शहरातून संध्याकाळी एक बाईक रॅली काढण्यात येणार आहे.
हेही वाचा: Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा १ मे पूर्वी सुटणार ?
आदित्य ठाकरे नाशिकमध्ये सायंकाळी दाखल होतील. उध्दव ठाकरे बुधवारी दुपारपर्यंत नाशिकमध्ये दाखल होतील. निर्धार मेळाव्यात बाळासाहेबांचे भाषण ऐकवले जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे आज असते तर काय बोलले असते याबाबत उत्सुकता असते. मुंबईमध्ये याबाबत प्रयोग झाला आहे. आता नाशिकमध्ये हा प्रयोग करणार आहोत असे ते म्हणाले.
काय म्हणाले खा. संजय राऊत
- बीड घटनेपेक्षा भयंकर घटना सिंधुदुर्ग मध्ये घडला आहे
- यासाठी वेळ पडली तर आम्ही कोकणात जाणार आहे
- आतापर्यंत तिथे 27 खून झाले आहे
- यात 9 जण शिवसैनिक आहेत याची चौकशी झाली पाहिजे
- बावनकुळे यांना फुले यांच्या विषयी इतका डोक्यात तिडीक का
- म्हणून आम्ही काल अग्रलेख च्या माध्यमातून फडणवीस यांना प्रश्न विचारले
- काही ब्राह्मण संघटना याला विरोध करत आहेत
- मी ब्राह्मण असल्याचं मला अभिमान आहे असं फडणवीस नेहमी म्हणतात
- त्यामुळे या विरोध करणार्या संघटनाना फडणवीस यांनी तंबी दिली पाहिजे
- लाडक्या बहिणींनी हा प्रश्न विचारले पाहिजे
- राज्यात आर्थिक संकटात आहे
- फडणवीस कितीही बोलले तरी आर्थिक संकटात हे राज्य सापडले आहे
- अजित पवार बोलत नसलेतरी या आर्थिक चिंतेने ते देखील ग्रासले आहेत
- अमित शहा यांच्याकडे तक्रार करण्यात आले
- आम्हाला निधी मिळत नाही याची तक्रार करण्यात आले
- निधी मिळत नाही म्हणजे कुणाला मिळत नाही
- जे काही गद्दार आमदार आहेत त्यांना फक्त राज्य लुटायचे आहे
- अमित शहा यांनी जे उत्तर दिले ते फार इंटरेस्टिंग आहे तुम्ही त्याचा शोध घ्या










