भुजबळ राष्ट्रीय राजकारणात जाणार का? समीर भुजबळ म्हणाले…

नाशिक – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचा नियोजित नाशिक दौरा तात्काळ रद्द करण्यात आला. त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात आले होते. आता हे कार्यक्रम माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर भुजबळ यांनीही महत्त्वाचे विधान केले आहे. “मी मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता, मात्र तो अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही,” असा मोठा दावा त्यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा देत नांदगाव-मनमाड मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

मुंबईतील कार्यकर्ते त्यांना मुंबईत सक्रिय राहण्याची विनंती करत आहेत, तर नाशिकमधील कार्यकर्ते त्यांना नाशिकमध्येच राहण्याचा सल्ला देत आहेत. या पार्श्वभूमीवर ते सध्या कोणत्या भूमिकेत कार्यरत राहतील, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

“मी येवला येथे नेहमीच जात असतो, पण भुजबळ राष्ट्रीय पातळीवर जाणार आहेत, असे सध्या तरी काहीही नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेबाबत सध्या तरी कोणताही बदल होणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत.

error: Content is protected !!