चालकांच्या सरंक्षणासाठी विशेष कायदा करण्यास सकारात्मक

केंद्रिय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांची ग्वाही

नाशिक । संपूर्ण देशातील चालकांची संख्या ३५ ते ४० टक्के कमी होत आहे. भविष्याच्या दृष्टीने हे मोठे संकट आहे. दळणवळण हे देशाच्या विकासासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. त्यादृष्टीने चालकांना शिक्षित करून करून त्यांच्यासाठी नवीन कायद्यांची तयारी आपण करू याबाबत शासन सकारात्मक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कायदे राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी केले.

केंद्रीय कायदे राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल नाशिक दौर्‍यावर असताना नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांची त्यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाहतूक व्यवस्थेचा कणा म्हणून ओळखल्या जाणार्‍या चालकवर्गावर सध्या विविध प्रकारच्या समस्या कोसळत आहेत. विशेषतः रस्ते अपघाताच्या घटनांनंतर चालकांवर जमावाकडून होणार्‍या मारहाणीच्या घटना चिंताजनक प्रमाणात वाढत आहेत. अपघात अनेकदा रस्त्यांची खराब स्थिती किंवा इतर कारणांमुळे होत असले तरी जबाबदारी अन्यायाने चालकांवर टाकली जाते. त्यामुळे चालकांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायद्याची तातडीची आवश्यकता असल्याची मागणी यावेळी मांडण्यात आली.

यावेळी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष, पीएम सैनी, चेअरमन राजेंद्र फड, पदाधिकारी रामभाऊ सूर्यवंशी, तेजपालसिंग सोढा, महेंद्रसिंग राजपूत, सियाराम शर्मा, बजरंग शर्मा, शक्ती सिंग,हरी गोविंद तिवारी, रविकांत भारद्वाज,प्रशांत वशिष्ठ,सजन सिंग, बाबूलाल रामावत, रमेश सारस्वत,रणधीर सिंग, अश्विन अत्री यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनसह वाहतूक संघटनांनी आपल्या विविध मागण्यांबाबत एकत्रित सर्व मुद्दे शासनाला द्यावे त्यावर शासनाकडून एकत्रित निर्णय घेऊ केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आश्वासित केले.

error: Content is protected !!