नाशिक । नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या त्रैवार्षिक निवडणुकीत (2025 ते 2027) खेळाडू पॅनेलने दणदणीत यश संपादन करत सर्व ११ जागांवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.
विद्यमान चेअरमन धनपाल (विनोद) शहा सातव्यांदा चेअरमनपदी निवडून आले असून, यामुळे त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दर्शवण्यात आला आहे.
गंगापूर रोडवरील नंदनवन लॉन्स येथे ही निवडणूक पार पडली. ही निवडणूक आज अन्नपूर्णा सभागृह, नंदनवन लॉन्स, एकूण १३७७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक अधिकारी म्हणून डॉ. मनीष लोणारी यांनी काम पाहिले.
निवडून आलेले उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते:
चेअरमन: धनपाल (विनोद) शहा – १२४३
कार्यकारिणी सदस्य:
विक्रांत मते – १२५५
नितीन धात्रक – १२२४
महेंद्र (राजू) आहेर – १२२२
अनिरुद्ध भांडारकर – १२३३
राघवेंद्र जोशी – १२११
बाळासाहेब मंडलिक – १२०५
निखिल टिपरी – ११९७
हेतल पटेल – ११६९
जगन्नाथ पिंपळे – ११०३
शिवाजी उगले – १०६४
पराभूत उमेदवार व त्यांचे मते:
महेश आव्हाड (चेअरमन) – ६८
संदीप सेनभक्त – ५६२
महेश भामरे – १९८
ज्ञानेन्द्र सिसोदिया – १५२
बिनविरोध निवडून आलेले पदाधिकारी:
सेक्रेटरी: समीर रकटे
खजिनदार: हेमंत देशपांडे
जॉइंट सेक्रेटरी: योगेश (मुन्ना) हिरे, चंद्रशेखर दंदणे
निवड समिती सदस्य: सतीश गायकवाड, तरुण गुप्ता, फैय्याज गंजीफ्रॉकवाला
या निवडणुकीनंतर उद्या होणार्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नव्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
- समीर रकटे, सेक्रेटरी, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन











