नाशिक : काठी गल्ली येथील दंगल प्रकरणी आत्तापर्यंत 39 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या घटनेत दंगल घडवल्या प्रकरणी अटकेत असलेल्या टिप्पर यांच्या प्रमुख समीर उर्फ छोटा पठाण याचा सोमवारी न्यायालयाच्या आदेशानुसार तपासा करता ताबा घेण्यात येणार आहे.
काठे गल्लीतील सातपीर बाबा दर्गाचे अतिक्रमण काढताना मोठ्या प्रमाणावर जमाव रस्त्यावर उतरला आणि या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. या घटनेमध्ये 20 पोलीस कर्मचारी जखमी झाले. आतापर्यंत पोलिसांनी या घटने प्रकरणी 1500 जणांवर गुन्हा दाखल केला असून 39 जणांना ताब्यात घेतले आहे. या सर्व संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायलयिन कोठडी देण्यात आलेली आहे.
या घटने प्रकरणी राजकीय कनेक्शन समोर आले. पोलिसांनी तपास करत असताना काँग्रेसच पदाधिकारी हनिफ बशीर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अरीफ हाजी पटेल, उबाठा गटाचा फाईन शेख दाऊद शेख या संशयीतांसह टिप्पर यांच्या प्रमुख समीर पठाण यांनी चितावणी दिल्याचं तपासामध्ये निष्पन्न झाले. पथकाने 39 जणांना अटक केली पठाण वगळता राजकीय पक्षाचे संबंधित संशयित अद्याप फरार आहेत.
या संशयीतांना न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यांना न्यायालय कोठडी सुनावण्यात आली असून कारागृहात रवांगी करण्यात आली आहे. पठाण याचा सोमवारी पोलीस ताबा घेणार आहे.
दर्गा दंगल प्रकरणी फरार संशयतांच्या शोधार्थ पथक रवाना करण्यात आली असून लवकरच संशयिताना ताब्यात घेतले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले या घटनेनंतर या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता होती गेल्या दोन दिवसांपासून या भागातील जनजीवन पूर्व पदावर आले आहे.







