नाशिक : नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (सिटीलिंक) प्रवाश्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. नियमित प्रवाश्यांसाठी सवलतीच्या पास सुविधा देतानाच, दिव्यांग प्रवाश्यांना मोफत प्रवासाची सुविधा देखील सिटीलिंकच्या वतीने दिली जाते.
दिव्यांग प्रवाश्यांना हे लाभ मिळण्यासाठी शासनाने जारी केलेले UDID (Unique Disability ID) कार्ड आवश्यक असून, त्याआधारे सिटीलिंककडून त्यांना विशेष दिव्यांग कार्ड प्रदान केले जाते.
सिटीलिंकच्या वतीने यापूर्वी दोन वेळा सूचित करण्यात आले असूनही काही प्रवाश्यांनी आपले UDID कार्ड सिटीलिंक मुख्य कार्यालयात अद्याप सादर केलेले नाही. अशा प्रवाश्यांचा विचार करून आता UDID कार्ड जमा करण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
जर संबंधित दिव्यांग प्रवाश्यांनी १५ ऑगस्टपर्यंत आपले UDID कार्ड (छायांकित प्रत) सिटीलिंक मुख्य कार्यालयात जमा केले नाही, तर १६ ऑगस्ट २०२५ पासून त्यांना मोफत प्रवासाची सुविधा मिळणार नाही.
सिटीलिंकचे आवाहन:
सिटी लिंकचे आवाहन
सर्व मोफत प्रवासाचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग प्रवाश्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन दिलेल्या मुदतीपूर्वी आपले दस्तावेज सादर करावेत, अन्यथा त्यांना प्रवासात अडचणींचा सामना करावा लागेल.










