महाराष्ट्र व्यापार-उद्योगाला जागतिक बाजारपेठेत संधी – माणगावे

मुंबई । महाराष्ट्रातील व्यापार-उद्योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अ‍ॅग्रीकल्चर (MACCIA) आणि युरोप इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स (EICC) यांच्यात सामंजस्य करार (MoU) झाला आहे. महाराष्ट्र चेंबरच्या मुख्यालयात हा करार करण्या आला.

या प्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी महाराष्ट्र चेंबरच्या कार्याचा आढावा घेतला. स्वातंत्र्यपूर्व काळापासून महाराष्ट्रातील व्यापार व उद्योग क्षेत्राला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी चेंबरने घेतलेल्या पुढाकाराची माहिती त्यांनी दिली. तसेच विविध देशांतील चेंबर ऑफ कॉमर्सबरोबर झालेल्या सामंजस्य करारांमुळे राज्यातील उद्योगांना जागतिक पातळीवर पोहोचण्याची संधी मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

रविंद्र माणगावे यांनी युरोप इंडिया चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमित लाट आणि त्यांच्या सहकार्‍यांचे स्वागत केले. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, या कराराच्या माध्यमातून महाराष्ट्रातील व्यापार आणि उद्योगांना जागतिक बाजारपेठेत नवनवीन संधी उपलब्ध होतील.

युरोप इंडिया चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमित लाट यांनी महाराष्ट्र चेंबरच्या कार्याचे कौतुक केले. दोन्ही चेंबरच्या संयुक्त प्रयत्नातून व्यापार-उद्योगांचा विकास साधला जाईल, बाजारपेठ मिळवून दिली जाईल आणि विविध नेटवर्किंग व उपक्रमांचे आयोजन केले जाईल, असे त्यांनी नमूद केले.

या कराराच्या प्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे ट्रस्ट बोर्ड चेअरमन आशिष पेडणेकर आणि मुंबई विभागाचे उपाध्यक्ष करुणा करुणाकर शेट्टी, शमिका नाडकर्णी, कैलास चांडक, प्रतीक सोनावणे हे उपस्थित होते.

error: Content is protected !!