ब्रेकिंग न्यूज । ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी, देशभरातून लष्कराचे कौतुक

नवी दिल्ली । भारतीय लष्कराने आज पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ प्रमुख कॅम्प्स उद्ध्वस्त करत पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्याचा सूड घेतला. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत तब्बल 100 किमी आत घुसून ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
या मिशनमध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनांच्या तळांना लक्ष्य करण्यात आले. बहावलपूरमधील जैशचे मुख्यालय तसेच मुरिदके, कोटली, मुजफ्फराबाद, गुलपूर, भिंबर, सियालकोट आणि चाक अम्रू येथील अड्ड्यांवर अचूक हल्ले करण्यात आले. यामध्ये मोठ्या संख्येने दहशतवादी ठार झाल्याचे समजते.

दहशतवादी उपस्थिती असलेले अड्डे:
बहावलपूर : 250 हून अधिक दहशतवादी

मुरिदके : 120+

मुजफ्फराबाद : 110-130

कोटली : 75-80

सियालकोट : 90-100

गुलपूर : 75-80

भिंबर : 60+

चाक अम्रू : 70-80

लष्कराची काळजीपूर्वक कारवाई
भारतीय सेनेने या स्ट्राईकमध्ये केवळ दहशतवाद्यांचे अड्डेच लक्ष्य केले असून, कोणत्याही पाकिस्तानी नागरिक किंवा लष्करी ठिकाणाला धक्का दिला नाही. ही कारवाई अत्यंत नियोजित, अचूक आणि संयमित पद्धतीने करण्यात आल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.

राजकीय वर्तुळातून कौतुकाचा वर्षाव
राहुल गांधी (काँग्रेस) – भारतीय सेनेचा अभिमान आहे. जय हिंद!
शरद पवार (राष्ट्रवादी – शरद गट) – ही कारवाई संपूर्ण देशासाठी गौरवाची आहे. जवानांचे मन:पूर्वक अभिनंदन!
असदुद्दीन ओवैसी (एआयएमआयएम) – पाकिस्तानला कठोर धडा शिकवण्याची ही योग्य वेळ. दहशतवाद्यांचे तळ नष्ट करणे गरजेचे आहे.
मल्लिकार्जुन खरगे (काँग्रेस अध्यक्ष) – राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत आम्ही एकसंघ आहोत. आमच्या सशस्त्र दलांचा आम्हाला अभिमान आहे.
अजित पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र) – पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशा कारवाया सुरु राहतील. ऑपरेशन सिंदूर हा ठोस संदेश आहे.

error: Content is protected !!