नाशिककरांची प्रतीक्षा संपणार ; वंदे भारतच्या धर्तीवर मेमू शटल, चाचणी सुरू

नाशिक । मुंबई ते नाशिक प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने या मार्गावर मेमू लोकल शटल सेवा सुरू करण्याची तयारी केली असून कसारा घाटात तिच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना मेल व एक्सप्रेस गाड्यांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल.

गेल्या अनेक वर्षांपासून या सेवेसाठी मागणी होत होती. तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्प वारंवार लांबणीवर गेला होता. मात्र आता घाटातील चढ-उतार आणि मार्गावरील अडचणींची कसून चाचणी घेतली जात आहे. लोकल भरगच्च प्रवासी घेऊन धावते का, वीजपुरवठा पुरेसा आहे का, तसेच बोगदे-वळणांमधील कार्यक्षमता कशी आहे, याची तपासणी केली जात आहे.

ही सेवा सुरू झाल्यानंतर मुंबई-नाशिक प्रवाशांना वेगवान, सोयीस्कर व किफायतशीर प्रवासाचा अनुभव घेता येईल. रेल्वे प्रशासनाकडून चाचण्या पूर्ण होताच सेवा सुरू करण्याचे संकेत मिळत आहेत.

मेमू लोकलची वैशिष्ट्ये
वंदे भारत ट्रेनसारखी आधुनिक सुविधा
एकूण १९ डबे, त्यापैकी ६ मोटर कोच
अधिक वेगवान
आरामदायी प्रवासाची हमी

मेमुची वैशिष्ट्ये

वंदे भारत ट्रेन सारखी रचना

एकूण 19 कोच असतील

प्रवास होणार गतिमान

error: Content is protected !!