चुकूनही या दिशेला करू नका गणपतीची स्थापना, होऊ शकतो अनर्थ!

नाशिक । आपल्या घरात किंवा कार्यालयात देवाची मूर्ती किंवा तसबीर लावताना अनेकांना योग्य दिशा माहीत नसते. चुकीच्या दिशेला मूर्ती किंवा फोटो लावल्यास वास्तूवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे वास्तुशास्त्र मानते. म्हणूनच देव्हारा, देवाची मूर्ती किंवा तसबीर यांची प्रतिष्ठापना करताना दिशा आणि रंग याला विशेष महत्त्व दिले जाते.

श्री गणरायाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेबाबत हिंदू धर्मशास्त्रात काही नियम सांगितले आहेत. श्री गणरायाची मूर्ती घरात ठेवल्याने कोणत्याही प्रकारचे दुःख, क्लेश निर्माण होत नाहीत, सर्व संकटे दूर होतात. परंतु यासाठी गणपतीची मूर्ती घरात योग्य दिशेला ठेवणे महत्त्वाचे असते. उत्तर किंवा ईशान्य दिशेला गणेशमूर्ती शुभ मानली जाते. पूर्व, पश्चिम दिशेला देखील प्राणप्रतिष्ठापना करू शकता. जर तुम्ही दक्षिण दिशेला गणेशमूर्ती ठेवली तर घरात नकारात्मकता वाढण्याची शक्यता असते. लाकडी टेबलावर गणेशाची स्थापना करू शकता. घरातील जिन्याखाली कदापि गणेशमूर्ती ठेवू नये, कारण आपण त्या जिन्यावरून चालतो आणि त्याखाली मूर्ती ठेवल्यास श्री गणरायाचा अपमान होतो.

तसेच, तुम्ही ज्या खोलीत झोपता आणि तुमचे पाय ज्या दिशेला असतात, त्याच्या आसपास श्री गणेशाची मूर्ती ठेवू नये. या ठिकाणी मूर्ती ठेवणं अशुभ मानले जाते. ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी जर तुम्हाला श्री गणेशाची मूर्ती ठेवायची असेल किंवा तिची प्राणप्रतिष्ठा करायची असेल, तर ती मूर्ती कधीही बसलेल्या स्वरूपात नसावी.

शास्त्रानुसार, गायीच्या शेणापासून बनवलेली गणेशमूर्ती अत्यंत शुभ मानली जाते. अशी मूर्ती जर तुम्ही घरात ठेवली तर घरात दुःख कधीच येत नाही, असं मानलं जातं. घरात धातूंची गणेशमूर्ती ठेवली तर सर्व प्रकारच्या वास्तुदोषांपासून मुक्ती मिळते. हळदीपासून बनवलेली श्री गणेशमूर्ती घरात ठेवल्यास भाग्याची नेहमीच साथ मिळते. श्री गणराय हे मांगल्याचं प्रतीक असल्यामुळे, श्री गणरायाच्या आगमनानं घरात उत्साह, आनंद, सुख, शांती येते. त्यामुळे श्री गणेशमूर्तीची रचना आणि ती ठेवण्याच्या ठिकाणांविषयी नियमांचं पालन केल्यास श्री गणरायाचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल.

गणपतीचे स्थान आणि दिशा

गणपती हे मंगलकार्याचे अधिष्ठाता देव मानले जातात. कोणत्याही पूजा-विधीची सुरुवात गणपतीच्या स्मरणानेच केली जाते. म्हणूनच बहुतेक घरांमध्ये गणपतीची मूर्ती किंवा तसबीर लावली जाते. वास्तुशास्त्रानुसार, गणपतीची मूर्ती घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवणे सर्वात शुभ मानले जाते. मात्र, गणपतीचे तोंड कधीही दक्षिण दिशेला नसावे.

ऑफिससाठी कशी मूर्ती योग्य?

कार्यालयात गणपतीची उभी असलेली मूर्ती किंवा तसबीर ठेवणे हितकारक मानले जाते. असे केल्यास नकारात्मकता दूर होऊन कार्यक्षेत्रात सकारात्मकता वाढते.

कोणत्या रंगाचा गणपती ठेवावा?

घरासाठी शुभ्र (पांढऱ्या) रंगाची मूर्ती सर्वात मंगलकारी मानली जाते.

केशरी रंगाची मूर्ती घरात समृद्धी व आनंद आणते.

मुलांच्या शिक्षणासाठी अभ्यासाच्या टेबलावर पिवळा किंवा फिकट रंगाचा गणपती ठेवणे लाभदायक मानले जाते.

लक्षात ठेवा

गणपतीची मूर्ती किंवा तसबीर नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेलाच ठेवावी. दक्षिण दिशेला मूर्ती ठेवल्यास अडथळे आणि त्रास वाढू शकतात.

error: Content is protected !!