Social media : या देशात फेसबुक, इन्स्टाग्राम आणि X वर बंदी; नेमकं कारण काय ?

काठमांडू । डिजिटल युगात सोशल मीडिया मानवी आयुष्याचा महत्वाचा भाग बनला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत लोक या प्लॅटफॉर्मवर सक्रिय असतात. मात्र, आता भारताच्या शेजारील देशाने सोशल मिडीयावरील फेसबुक, इन्स्टाग्राम आणि X (माजी ट्विटर) या साईटसवरच बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू ही बंदी तात्पुरती असणार आहे.

नेपाळ सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या देशातील माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करण्यास सांगितले होते. त्यासाठी कंपन्यांना ठरावीक कालावधीही देण्यात आला होता. मात्र, फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, लिंक्डइनसारख्या कंपन्यांनी नोंदणी केली नाही. त्यामुळे सरकारने थेट बंदीचा निर्णय घेतला.

सध्या टिकटॉक, व्हीटॉक, वायबर आणि निंबज हे प्लॅटफॉर्म नेपाळमध्ये अधिकृतरीत्या नोंदणीकृत आहेत. तसेच टेलिग्राम आणि ग्लोबल डायरी नोंदणी प्रक्रियेत आहेत. मात्र, मेटा कंपनीच्या अंतर्गत असलेले फेसबुक, इन्स्टाग्राम व व्हॉट्सअ‍ॅप तसेच यूट्यूब आणि लिंक्डइनवर बंदी घालण्यात आली आहे.

error: Content is protected !!