“साहेब, आता तुम्हीच राज साहेबांना मातोश्रीचे आमंत्रण द्या!”

नाशिक : “आम्हांला आमिष दिले गेले… मोठ्या मोठ्या ऑफर्स आल्या… दबावही टाकला गेला… पण आम्ही डगमग आलो नाही, घाबरलो नाही. तुमच्या नेतृत्वावर आणि आदित्य साहेबांवरील आमचा विश्वास अढळ राहिला. एकनिष्ठ राहिलो.” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत अनेक शिवसैनिकांनी आता थेट उद्धव ठाकरे साहेबांना एक कळकळीची विनंती केली आहे — “साहेब, आता तुम्हीच राज ठाकरे साहेबांना मातोश्रीवर आमंत्रित करा!”

ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेनंतर शिवसेनेतील निष्ठावंत कार्यकर्ते सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात एक सकारात्मक वळण घडावं, यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्या मते, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील मतभेद आता बाजूला ठेवून, एकत्र येण्याची हीच योग्य वेळ आहे.या करता नाशिक मध्ये शिवसेना पदाधिकारी बाळा दराडे आणि माजी नगरसेविका किरण दराडे यांनी लावलेले होल्डिंग सर्व शिवसैनिक, मनसैनिक आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

“राज्याला सुसंधी, एकात्मतेचा संदेश द्या. मातोश्री आणि कृष्णकुंज एकत्र आले, तर महाराष्ट्राला नवे बळ मिळेल,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची एकच मागणी आहे —
“साहेब, तुम्हीच पुढाकार घ्या आणि राज साहेबांना मातोश्रीवर आमंत्रण द्या. हीच महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी ठरेल!”

जय महाराष्ट्र!

error: Content is protected !!