Nashik : सीएनजी तुटवडा; 26 एप्रिलपासून पंप बंदचा इशारा

नाशिक | नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सीएनजी गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे वाहनधारकांसह पंप चालकही त्रस्त झाले आहेत. पुरवठा वेळेवर व सुरळीत न मिळाल्यामुळे पंप चालकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

सीएनजी पुरवठा करणाऱ्या एमएनजीएल (MNGL) कंपनीकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता शहरातील सीएनजी पंप चालकांनी अंतिम इशारा दिला आहे की, 25 एप्रिलपर्यंत सीएनजी पुरवठा सुरळीत न झाल्यास 26 एप्रिलपासून सर्व सीएनजी पंप बंद ठेवण्यात येणार आहेत.

पंप चालकांची मागणी आहे की, दररोज किमान 10 तासांपर्यंत नियमित सीएनजी पुरवठा करण्यात यावा. यामुळेच नागरिकांना होणाऱ्या गैरसोयी टाळता येतील.

हेही वाचा : नाशिकमध्ये तणाव ; 15 जण ताब्यात, 70 वाहन जमा

सध्या परिस्थिती अशी आहे की, अनेक वाहनधारकांना रांगेत तासन्‌तास उभे राहावे लागत असून, याचा थेट परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. प्रशासन आणि MNGL कंपनीने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

जर 25 एप्रिलपर्यंत परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर 26 तारखेपासून शहरातील सर्व सीएनजी पंप बंद राहतील आणि त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!