नाशिक । सप्तश्रृंगी गडावर दरेगाव भागातील मोहनदरी फाट्याजवळ मंगळवारी सकाळी झालेल्या अपघातात २६ भाविक जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनूसार सप्तश्रृंगी गडावर नवसपूर्तीसाठी जात असतांना पिकअप व्हॅन पलटी होउन सदरचा अपघात घडला.
नाशिक ते कळवण रस्त्यावर प्रवास करत असताना मोहनदरी फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाले. त्यामुळे वाहनातील २६ भाविक जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी, वाहनचालकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले.
स्थानिकांच्या वाहनांमधून जखमींना वणी ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून जखमींवर उपचार सुरू आहेत.
जखमींमध्ये आशाबाई खडसे, रोशनी बांगरे, प्रियांश जाधव, खुशी बोरकर, तनु खंदारे, अनिल बोरकर, आयोध्या जाधव, विलास पारवे, नंदा पारवे, ओम गायकवाड, गणेश बोरकर, हर्षदा बोरकर, शारदा बोरकर, अंबादास बोरकर, संजना हिवराळे, सखाराम पारवे, राधा पारवे, मनकणीबाई खरांदे, मनीषा बोरकर, गणेश बांगरे, छाया तांबे, एकनाथ हिरवाळे, शिवानी खंदारे, अर्चना पालवे, शोभा खंदारे यांचा सामावेश आहे.











