नम: नाशिक – प्रॉपर्टीच्या महाकुंभास उत्स्फूर्त प्रतिसाद ; नाशिककडे गुंतवणूकदारांचा ओढा

नाशिक । 14 ऑगस्टपासून ठक्कर डोम येथे क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे सुरू झालेल्या “नम: नाशिक – प्रॉपर्टीचा महाकुंभ” या गृह प्रदर्शनाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या तीन दिवसांतच 40 हून अधिक सदनिकांचे व 25 हून अधिक प्लॉटचे स्पॉट बुकिंग झाले आहे. तसेच लाँग वीकेंडचा लाभ घेत अनेक साईट व्हिजिट्सचे नियोजनही करण्यात आले.

क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी सांगितले की, नाशिक जिल्ह्यासह धुळे, जळगाव, अहमदनगर, तसेच मुंबई, ठाणे व पुणे येथून नागरिक प्रदर्शनास भेट देत आहेत. 2027 च्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये घर घेण्याची उत्सुकता प्रकर्षाने जाणवत आहे. त्यांनी सांगितले की, नाशिकची वाटचाल ग्लोबल सिटीकडे सुरू असून, अशा एक्स्पोमध्ये भविष्यातील नाशिकची झलक दिसते.


समन्वयक ऋषिकेश कोते यांनी सांगितले की, औद्योगिक, शैक्षणिक, धार्मिक व कृषिपूरक उद्योगामुळे नाशिकमध्ये रोजगार व व्यवसायाच्या भरपूर संधी आहेत. त्यामुळे भविष्यात घरांच्या किमती वाढण्याची शक्यता असून सध्या रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठी पोषक काळ आहे.

समन्वयक नरेंद्र कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की, शहराच्या प्रगतीत बांधकाम व्यावसायिकांचा मोठा वाटा आहे. एका गृह प्रकल्पातून अनेक रोजगार आणि व्यवसाय निर्माण होतात. प्रदर्शनात ५०० हून अधिक फ्लॅट्स, प्लॉट्स, दुकाने व ऑफिसेसचे पर्याय उपलब्ध असून आघाडीच्या गृहकर्ज संस्था देखील सहभागी आहेत.

प्रदर्शनास दिपक बिल्डर्स अँड डेवलपर्स यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले असून प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार संकलेचा, एक्सपो कमिटीचे प्रमुख मनोज खिवंसरा, आयपीपी कृणाल पाटील, उपाध्यक्ष अनिल आहेर, उदय घुगे , अंजन भालोदिया,कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा, सहसचिव सचिन बागड, हंसराज देशमुख, , मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे , अनंत ठाकरे, विजय चव्हाणके आदी प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नरत आहेत.

error: Content is protected !!