नाशिक | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते अमितबठाकरे यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील विविध नागरी समस्यांच्या विरोधात ‘घंटानाद आंदोलन’ आयोजित करीत आहे. हे आंदोलन सोमवार, दि. २१ एप्रिल रोजी सकाळी १० ते १ या वेळेत होणार आहे.
नाशिक महानगरपालिका भवनासमोरील राजीव गांधी भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हे आंदोलन कारण्यात येणार असून, मनसेच्या ‘राजगड’ जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.
शहरातील पाणीपुरवठा, स्मार्ट सिटी प्रकल्प, रस्त्यांची दुरवस्था, तसेच नागरी सुविधांमध्ये प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात मनसे आवाज उठवणार आहे. घंटानाद आंदोलनाद्वारे सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा मनसेचा उद्देश आहे.











