मुंबई । मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेनंतर आता केंद्र सरकारच्या मिशन शक्ती अंतर्गत महिलांना नोकरी दरम्यान मुलांची काळजी घेता यावी, यासाठी ‘पाळणा’ योजना सुरू करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार असून मुलांच्या संगोपनासाठी सुरक्षित आणि दर्जेदार सेवा मिळणार आहेत.
या योजनेंतर्गत महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. या पाळणाघरांमध्ये डे-केअर सुविधा, पूर्व शालेय शिक्षण, पूरक पोषण आहार, मुलांच्या वाढीचे निरीक्षण, आरोग्य तपासणी व लसीकरण यांसारख्या सेवा दिल्या जाणार आहेत. तसेच मुलांना दिवसातून तीन वेळा – सकाळचा नाश्ता, दुपारचे गरम जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता – पुरवला जाईल.
पाळणा घराची वैशिष्ट्ये:
महिन्यात २६ दिवस
दररोज साडेसात तास सुरू राहणार.
एका पाळणाघरात जास्तीत जास्त २५ मुले.
प्रत्येक केंद्रात एक पाळणा सेविका आणि एक मदतनीस.
वीज, स्वच्छ पिण्याचे पाणी, बालस्नेही शौचालय यांसारख्या सुविधा.
मानधन व भत्ते:
अंगणवाडी सेविका – १५०० रू.प्रतिमाह
अंगणवाडी मदतनीस – ७५० रू.प्रतिमाह
पाळणा सेविका – ५५०० रू. प्रतिमाह
पाळणा मदतनीस – ३००० रू.प्रतिमाह
पात्रता:
पाळणा सेविका – किमान बारावी उत्तीर्ण
पाळणा मदतनीस – किमान दहावी उत्तीर्ण
वयोमर्यादा – किमान २० ते कमाल ४५ वर्षे
स्थानिक उमेदवारांना प्राधान्य
देण्यात येणाऱ्या सुविधा
डे केअर सुविधा
३ ते ६ वर्षांच्या बालकांसाठी पूर्व शालेय शिक्षण
वाढीचे निरीक्षण
आरोग्य तपासणी
लसीकरण









