एमआयडीसीतील खड्डे तातडीनं बुजवा ; भुजबळ यांचे यंत्रणेला निर्देश

नाशिक : नाशिक शहरातील एमआयडीसीतील रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने याठिकाणी अपघाताचे प्रमाण अधिक वाढले आहे. याबाबत नाशिकच्या उद्योजकांनी आज राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची नाशिक येथील कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर या उद्योजकांसमवेत एमआयडीसीतील रस्त्यांची पाहणी करत या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावे अशा सूचना त्यांनी सबंधित यंत्रणेला दिल्या.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष तथा नाशिक म्हाडाचे अध्यक्ष रंजन ठाकरे, महिला शहराध्यक्षा योगिता आहेर,माजी अध्यक्ष धनंजय बेळे, आयमा संस्थेचे अध्यक्ष ललित बूब, निमा संस्थेचे उपाध्यक्ष मनीष रावल, आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, उमेश कोठावदे, हेमंत खोंड, दिलीप वाघ,राहुल गांगुर्डे, जयंत पगार, अजय यादव, रणजीत सानप यांच्यासह पदाधिकारी व उद्योजक उपस्थित होते.

error: Content is protected !!