नाशिक । एप्रिल महिन्यातच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाणी टंचाईची भीषणता वाढली आहे. धरणांचा जिल्हा असलेल्या नाशिक जिल्हयातील अनेक तालुक्यांमध्ये अक्षरशः हंडाभर पाण्यासाठी महिलांना जीव धोक्यात घालून विहीरीत उतरावे लागते तर पेठ तालुक्यातील बोरीची बारी या गावातील विहिरीने तळ गाठला असून अक्षरशः घोटभर पाण्यासाठी महिलांना जीवाची बाजी लावावी लागते आहे.
विशेष म्हणजे धरणांच्या जिल्हयात पाण्यासाठी 60 रुपये देऊन एक टीप पाणी विकत घेण्याची वेळ या गावातील नागरीकांवर आली आहे. तसेच पाण्याच्या या भीषण परिस्थितीमुळे गावात आता लोक लग्नासाठी मुलीच देत नसल्याने गावातील नागरिक सांगतात.
पेठ तालुक्यात वसलेले बोरीची बारी गाव.. गावात असलेली पाणीटंचाई इथल्या ग्रामस्थांसाठी आता वारसाने आलेली समस्या आहे.. वर्षानुवर्ष इथल्या विहिरीला पाणी नसतं. पाण्याने तळ गाठला की महिला दोरीच्या सहाय्याने पाण्यात उतरतात किंवा विहिरीच्या काठावरून जीवाची परवा न करता घोटभर पाण्यासाठी तासनतास उभ्या असतात.. जीव धोक्यात घालून विहिरीत उतरून देखील पाणी मिळत नसल्याने गावातील नागरिक टँकर मधून 60 रुपये देऊन एक टीप आणि विकत घेतात.
एकीकडे ज्या गावात पाणीटंचाई आहे त्या गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याचे प्रशासन सांगत असले तरी गाव पाड्यात मात्र परिस्थिती वेगळीच आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दोन किलोमीटर लांब पायपीट करावी लागते.. विशेष म्हणजे घरातले सर्वजण मिळून अनेकदा हंडावर पाण्यासाठी पहाटेपासूनच गर्दी करतात. गावात पाण्याची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून असल्याने या गावात मुलांना लग्नासाठी मुली देखील मिळत नसल्याचे गावकरी सांगतात.. त्यामुळे गावात जवळपास 50 मुलांचे लग्न झाले नसल्याचे देखील भीषण वास्तव समोर आले आहे.
पाण्यासाठी एखादा प्लास्टिकचा डबा विहिरीत टाकला जरी तरी ओंजळभर पाणी सुद्धा पिण्यालायक नसत.ं वर्षांवर्ष पाण्याच्या या भीषण टंचाईमुळे गावातल्या मुलांना कोणी मुली द्यायला तयार नाही.. त्यामुळे इथल्या दुष्काळाचा परिणाम फक्त महिला आणि पुरुषांवरच नाही तर लग्नाच्या वयातील तरुणांवर देखील होतो आहे.











