दहावी निकालानंतर महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून यंदा राज्याचा एकूण निकाल ९४.१० टक्के लागला आहे. या निकालात कोकण विभागाने ९९.८२ टक्के निकालासह अव्वल स्थान पटकावले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून मुलींची उत्तीर्णता टक्केवारी ९६.१४ इतकी असून मुलांची ९२.२१ टक्के इतकी आहे. दहावीच्या निकालापूर्वीच महाराष्ट्र बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

या निकालासोबतच महाराष्ट्र बोर्डाने अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबतही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यावर्षीपासून संपूर्ण राज्यात अकरावीचे प्रवेश फक्त ऑनलाईन पद्धतीने होतील. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जामध्ये किमान एक आणि कमाल दहा महाविद्यालयांची नावे प्राधान्यक्रमानुसार नमूद करता येणार आहेत.

विशेष बाब म्हणजे, विद्यार्थ्याने नमूद केलेल्या पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात जर गुणांनुसार प्रवेश मिळाला, तर तो प्रवेश घेणे बंधनकारक असेल. जर विद्यार्थी प्रथम प्राधान्य स्वीकारत नाही, तर त्याला नियमित फेरीत प्रवेश घेण्याचा हक्क नाकारला जाईल व त्याला नंतर खुल्या विशेष फेरीतच प्रवेश घ्यावा लागेल.

सरकारने खासगी शाळा आणि संस्थांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, कोणताही प्रवेश ऑफलाइन पद्धतीने करता येणार नाही. तसेच, चुकीची माहिती भरल्यास किंवा दिशाभूल करणारे अर्ज केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असेही अधोरेखित करण्यात आले आहे.

विभागनिहाय टक्केवारी अशी
कोकण : 99.82%
कोल्हापूर : 96.78%
मुंबई : 95.84%
पुणे : 94.81%
नाशिक : 93.04%
अमरावती : 92.95%
संभाजीनगर : 92.82%
लातूर : 92.77%
नागपूर : 90.78%

error: Content is protected !!