सर्व वकिल सोमवारी न्यायालयील कामकाजपासून राहणार दूर

नाशिक । अ‍ॅडव्होकेटस प्रोटेक्शन बिल च्या मागणीसाठी राज्यातील उच्च न्यायालय, जिल्हा व तालुका न्यायालयातील सर्व वकिलांनी सोमवार दि.२ रोजी एक दिवस न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा ठराव मराष्ट्र व गोवा वकील परिषदेने घेतला आहे.

गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातील अनेक भागात वकीलांवरती विविध हल्ले झालेले आहेत. एवढेच नव्हेतर काही वकीलांना आपल्या अमूल्य जीवास मुकावे लागले आहे. याबाबतीत अनेक बार असोसिएशनकडून निषेधाचे ठराव प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे वकीलांच्या संरक्षणासाठी कायदयाचा मसुदा तयार करुन सदर मसुदा सर्व वकील संघाकडे सूचना देण्यासाठी पाठविण्यात आलेला होता.

महाराष्ट्रातील अनेक बार असोसिएशनने सदरहू मसुदयामध्ये महत्वपूर्ण सूचना आणि सुधारणा सुचविल्या होत्या. त्याचा विचार करुन वकील संरक्षण कायदयाचा कच्चा मसुदा अ‍ॅडव्होकेट जनरल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता. सदरहू प्रश्नावर वारंवार सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बार कौन्सिल मार्फत आवाज उठविण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी सदरहू प्रश्न हा विचारार्थ आहे असे अनेक सार्वजनिक कार्यक्रमात सांगितले आहे.

नुकत्याच अहिल्यानगर मधील शेवगाव तालुक्यातील वकीलावर त्यांनी उलट तपासणीमध्ये विचारलेल्या प्रश्नावर चिडून जावून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने आपल्या सर्वसाधारण सभेमध्ये सदरच्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्याचा ठराव पारित केला आहे.

त्याचप्रमाणे वकील वर्गाचे आत्मसन्मानासाठी, सुरक्षेसाठी आणि बार असोसिएशनच्या स्वातंत्र्यासाठी दिनांक 3 नोव्हेंबर रोजी रोजीचे न्यायालयीन कामकाजापासून एक दिवसासाठी अलिप्त राहून निषेध व्यक्त करण्याचा ठराव पारित केला आहे.

error: Content is protected !!