मनमाड इंदूर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाला गती, असा होणार फायदा

नाशिक । केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी मनमाड-इंदूर रेल्वे प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळत असून, भूसंपादन प्रक्रियेची तयारी सुरू झाली आहे. ३५१ किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी दोन महिन्यांत संयुक्त मोजणी पूर्ण केली जाणार असून, त्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

या प्रकल्पाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील मनमाड ते झोडगे या ६१ किलोमीटर रेल्वेमार्गासाठी १३८४ गट निश्चित करण्यात आले असून, त्यामधील जमीन संपादित केली जाणार आहे. एकूण २१ गावांतील शेतजमिनी प्रकल्पासाठी लागणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून या प्रकल्पावर देखरेख केली जात आहे, त्यामुळे स्थानिक प्रशासनाने जागेवर मोजणीसाठी भूमी अभिलेख पत्र दिले आहे आणि प्रत्यक्ष मोजणीसाठी तयारी सुरू केली आहे.

महत्त्वाचे फायदे –
मनमाड ते इंदूर अंतर ३४० किलोमीटर
सध्याचे मुंबई-इंदूर अंतर ८२९ किलोमीटर
या प्रकल्पामुळे २०० कि.मी. ने कमी होणार.
इंदूर मुंबई रेल्वे तिकीटात २०% पर्यंत बचत होणार.
महाराष्ट्रातील अंतर १९२ कि.मी
मध्य प्रदेशातील अंतर १४७ कि.मी भाग
एकूण १०८ लहान पूल, ६६ मोठे पूल,
२ बोगदे आणि ४६ नवीन रेल्वे स्थानकांची उभारणी.
९ लेव्हल क्रॉसिंग्स.
३० नविन रेल्वे स्थानकांची निर्मिती
४ जुन्या स्थानकांवरून सेवा सुरू होणार.
प्रकल्प खर्च – १८,०३६ कोटी खर्च अपेक्षित आहे.

तीर्थक्षेत्र जोडणार
या मार्गामुळे उज्जैन येथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग व इतर धार्मिक स्थळांना सहज प्रवेश मिळणार आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. तसेच, नाशिक, धुळे (महाराष्ट्र) आणि धार, खरगोन, बडवानी (मध्य प्रदेश) या दुर्गम आणि आदिवासी भागात रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे प्रगतीचा नवा मार्ग खुले होणार आहे.हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पश्चिम भारतातील महत्त्वपूर्ण शहरांना जलद, सुरक्षित आणि परवडणार्‍या दरात रेल्वे सेवा उपलब्ध होणार असून, त्याचा दीर्घकालीन परिणाम सामाजिक आणि आर्थिक विकासावर होईल.

error: Content is protected !!