पोस्ट विभागात नोकरीची संधी, कोण करू शकते अर्ज ?

नाशिक । नाशिक पोस्ट विभागात टपाल जीवन विमा योजनेसाठी विमा एजंटची मुलाखतीद्वारे नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी 24 जून रोजी सकाळी 11 वाजता वरिष्ठ डाक अधीक्षक नाशिक विभाग यांच्या कार्यालयात मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रासह नियोजित स्थळी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक (डाकघर) नाशिक विभाग, नाशिक यांनी केले आहे.

विमा एजंटसाठी उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असवे व तो इयत्ता 10 वी अथवा समतुल्य परिक्षा (केंद्र अथवा राज्य सरकार मान्यताप्राप्त) उत्तीर्ण असावा. उमेदवारास संगणकाचे अथवा स्थानिक ठिकाणांचे ज्ञान आवश्यक आहे. सद्य:स्थितीत उमेदवार हा कोणत्याही आयुर्विमा कंपनीचा एजंट नसावा. निवड झालेल्या उमेदवारास रूपये 5 हजार चे राष्ट्रीय बचत पत्र (NSC) सिक्युरिटी डिपॉझिट स्वरूपात भरणे आवश्यक आहे.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारास डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात परवाना देण्यात येईल नंतर IRDAI ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराचा परवाना कायम करण्यात येईल व तो परवाना 5 वर्षासाठी वैध राहील. उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, परस्पर संवाद कौशल्य, जीवन विमा बाबतचे ज्ञान या आधारवर केली जाणार आहे.

पात्र बेरोजगार, स्वयंरोजगारीत तरूण, सेवानिवृत्त सैनिक,पूर्वी विमा प्रतिनिधी म्हणून काम केलेल्या व्यक्ती, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ सदस्य, निवृत्त शिक्षक, बचत गट प्रतिनिधी विमा एजंट मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. अधिक माहितीसाठी प्रवर डाक अधीक्षक, नाशिक विभाग यांचे कार्यालय अथवा कोणत्याही नजीकच्या डाक कार्यालयात संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

error: Content is protected !!