नाशिक । मराठा सेवा संघ संचालित जिजाऊ रथ यात्रा २०२५ ही बुधवार (दि.२३) रोजी नाशिकमध्ये येत असून आडगाव येथे या रथयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी मराठा समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
जातीयवाद, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, धार्मिक व राजकीय उन्माद यांसारख्या अनेक कारणांनी सामाजिक एकता धोक्यात आली आहे. यामुळे समाजमन अस्वस्थ, संशय ग्रस्त व असुरक्षित वाटत आहे. त्याचा थेट परिणाम आपल्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेवर होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी युवक-युवती, विद्यार्थी, शेतकरी, प्रौढ महिला-पुरुष यांच्याशी संवाद साधण्यासाठी, समाजाला एकसंघ करण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात बंधुभाव जपत आपल्या ऐक्याचा जागर घालण्यासाठी मराठा सेवा संघाच्या माध्यमातुन जिजाऊ रथयात्रा २०२५ अंतर्गत मराठा जोडो अभियान आयोजित करण्यात आले आहे.
४५ दिवसांच्या या रथयात्रेचा समारोप १ मे रोजी लाल महाल पुणे येथे होणार आहे. यात्रेचे आज नाशिकमध्ये आगमन झाले यावेळी शिवसेना नेते सुनिल बागुल, अद्वय हिरे, जयंत दिंडे, गजानन शेलार, राजू लवटे, करण भाऊ गायकर यांच्या हस्ते रथयात्रेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन बालाजी माळोदे, सुनिल जाधव, अतुल मते, प्रभाकर माळोदे, उमेश शिंदे, पोपट शिंदे, संदीप लभडे, शेखर लभडे, गोकुळ मते, रविंद्र जाधव, अॅड. प्रकाश शिंदे, अभय माळोदे, सुदाम दुशिंग, गोरख लभडे आदींनी केले होते.











