राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष पदासाठी ‘हे’ आहेत इच्छुक

नाशिक । युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष पदासाठी सोमवार (दि.८) रोजी मुलाखती घेण्यात आल्या. पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी व युवक नेतृत्व घडवण्यासाठी राबविण्यात आलेल्या या निवड प्रक्रियेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या मुलाखती प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या आदेशानुसार व शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष कार्यालय, भाभा नगर कॉर्नर, नाशिक येथे पार पडल्या. या प्रक्रियेसाठी प्रदेश निरीक्षक उमेश अग्रवाल हे खास मुंबईहून नाशिकमध्ये उपस्थित राहिले.

हे आहेत इच्छुक
जिल्हाध्यक्ष पदासाठी झालेल्या मुलाखतींमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून महेश शेळके, शादाब सय्यद, विक्रम डहाळे आणि समाधान कोठुळे यांनी सहभाग नोंदवला. या वेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय पाटील, प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण मंडाले, ओबीसी सेल उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष छबू नागरे, शहर सरचिटणीस मुन्नाभाई अन्सारी, विधानसभा अध्यक्ष धनंजय रहाणे, अशोक पाटील मोगल, अशोक पाळदे, सचिन आहेर, अब्बूभाई शेख यांच्यासह युवक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

लवकरच अंतिम निर्णय
युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी ही निवड प्रक्रिया महत्त्वाची असून, लवकरच नाशिक शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी अंतिम निर्णय घोषित केला जाईल, अशी माहिती शहर सरचिटणीस मुन्ना अन्सारी यांनी दिली.

error: Content is protected !!