नाशिक | नाशिक मध्ये होणाऱ्या मॉक ड्रिल संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात झाली असून या मॉक ड्रिल चे संपूर्ण नियोजन या बैठकीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या बैठकीसाठी NDRF त्याच प्रमाणे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित झाले आहेत.
भारत पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने प्रतिउत्तरा दाखल ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानला चौख प्रत्युत्तर दिल. दरम्यान या कारवाईनंतर आता मॉक ड्रिल कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये हे मॉक ड्रिल होणार आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी काय काळजी घ्यावी आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये विविध विभागांची असलेली तयारी यासंदर्भातला हे मॉक ड्रिल असेल.
नाशिकमध्ये दुपारी चार वाजता केटीएच महाविद्यालय प्रांगणात मॉक ड्रिल होणार आहे. या मॉक ड्रिल च्या संदर्भामध्ये नागरी संरक्षण दल आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात झालेली आहे. या बैठकीमध्ये या मॉक ड्रिलच् संपूर्ण नियोजन करण्यात येईल. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार सायरन वाचविण्यात येणार आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये हे सायरन केव्हा वाजतील? ब्लॅकआऊट केव्हा केला जाईल? मॉक ड्रिल कशा स्वरूपाचा असेल या संपूर्ण प्रक्रिये बाबतची माहिती काही वेळात जिल्हाधिकारी पत्रकार परिषदेत जाहीर करतील अस सांगण्यात येते.
दरम्यान, पावसाळा पूर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठकही आयोजित करण्यात आली असून पूर परिस्थिती करावयाचे नियोजन याबाबत आराखडा तयार करण्यात आला आहे.







