नाशिक – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार मा. हुसैन दलवाई साहेब आज नाशिकच्या दौऱ्यावर असून, पखाल रोड परिसरातील सातपूर दर्ग्याच्या अनधिकृत बांधकाम हटवण्याच्या कारवाई संदर्भात ते प्रशासनाशी चर्चा करून भेट देणार आहेत.
आज सकाळी १०:३० वाजता दलवाई यांचे शासकीय विश्रामगृह, नाशिक येथे आगमन होईल. त्यानंतर ते काठे गल्ली, सातपीर दर्गा परिसरातील स्थानिक नागरिकांची भेट देणार आहेत. दुपारी १ वाजता पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन संपूर्ण घटनेबाबत सविस्तर चर्चा करतील. दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी यांची देखील ते भेट घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ४ वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधतील.
दर्गा प्रकरणी याचिका फेटाळली
पखालरोड परिसरातील दर्ग्याच्या अनधिकृत बांधकाम हटवण्याच्या महापालिकेच्या कारवाईविरोधात दाखल याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. आता याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा देण्यात आलेली आहे. या कारवाईनंतर दर्गा ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती परंतु सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाकडे या संदर्भातला अहवाल मागविण्यात आलेला होता त्यावर सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावलेली आहे त्यामुळे महानगरपालिकेला हा मोठा दिलासा मानला जात आहे.









