नाशिकमध्ये जोरधार ; या धरणातून पाणी विसर्ग

नाशिक : नाशिक शहर आणि जिल्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून नाशिकला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे नाशिकचे रस्ते जलमय झाले असून,दारणा व पालखेड धरणातून काही वेळातच पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

दारणा धरणाच्या पाणी परिचलन सूचनेनुसार 30 जून अखेर धरणात 48% पाणीसाठा असणे आवश्यक आहे मात्र आजमितीला धरणात 50 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून परिचलन सूचीनुसार धरणातून दुपारी 3 वाजता 1100 विषय पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

पालखेड धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार चालू असल्यामुळे *दिंडोरी तालुक्यातील धामण व कोलवण नद्या व नाले दुथडी भरून वाहत आहे. पालखेड धरण परीचालन सुची नुसार व धरणातील पाणी साठ्यातील होणारी झपाट्याने वाढ तसेच पावसामुळे येणारी आवक बघता पालखेड धरणातून कादवा नदीमध्ये विसर्ग प्रवाहित करण्याची शक्यता आहे.

तसेच पुढील कालावधीत धरणामधील आवक बघून टप्याटप्याने विसर्ग वाढवावा लागणार आहे. तरी कादवा नदीकाठच्या नागरीकांना आवाहन करण्यात येते की नदीप्रवाहात कोणीही जावू नये तसेच नदीकाठ लगतच्या आपली पशु-धन, चीजवस्तु, शेतीमोटार पंप सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे. असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

नाशिक शहरातील आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार नाशिकला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे या पावसामुळे नदीकाठच्या लहान-मोठे मंदिर देखील पाण्याखाली गेली आहे. तर त्र्यंबकेश्वर शहरातही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे दिसून येते.

error: Content is protected !!