नाशिक । यंदा नाशिक जिल्हयात पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र अजूनही पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानूसार २६ ते ३० सप्टेंबर दरम्यान वादळी वारयासह मुसळधार पाउस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानूसार दि.२६ ते ३० सप्टेंंबर कालावधीमध्ये नाशिक जिल्हयात मोठया प्रमाणात वादळी वारयासह पाउस पडण्याची शक्यता आहे. यामुळे धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची मोठया प्रमाणावर पाउस पडल्यास पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे. त्यामुळे नागरीकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
मुंबई वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानूसार २६ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला असून ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. २७ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट तर २८ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. २९ आणि ३० रोजी देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
यंदा १ जून ते आजपर्यंतचे पर्जन्यमान पाहता ७२१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर मागील वर्षी ८३८.९ मिलीमीटी पावसाची नोंद झाली होती.यंदा जून महिन्यात २३३ मिलीमीटर, जुलैमध्ये १९८ मिलीमीटर, ऑगस्ट महिन्यात १२० मिलीमीटर तर सप्टेंबरमध्ये १३९.८ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. या काळात जिल्हयातून झालेल्या विसर्गामुळे सप्टेंबर अखेर जायकवाडी धरणात ७७ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
पावसाचा जोर वाढल्यास गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी, दारणा, मुकणे, वाकी, कडवा, नांदुर मध्यमेश्वर बंधारा आदी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाउस पडल्यास धरणांतून विसर्ग सोडण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरीकांनी आपले साहित्य व जनावरे तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावेत असा इशारा पाटबंधारे विभागाच्यावतीने कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी दिला आहे. सदर बातमीत कोणताही बदल न करता शुध्दलेखन तपासा








