मंत्री गिरीश महाजन यांचे महायुती संदर्भात ‘मोठ’ भाष्य

नाशिक : नाशिकमध्ये आज मंत्री गिरीश महाजन यांनी अनेक राजकीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर खुलासा केला. त्याचप्रमाणे यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या संदर्भात महायुती संदर्भातही मोठा भाष्य केलं

मंत्री गिरीश महाजन यांनी पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर भाष्य करत सांगितले की, “काल सिजफायर जाहीर झाला असला तरी अजूनही अधूनमधून गोळीबार सुरूच आहे. पंतप्रधानांनी योग्य उत्तर दिले आहे आणि जर पाकिस्तानची स्थिती अशीच राहिली तर त्यांना कडक इशारा दिला जाईल.

संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांना उत्तर देताना ते म्हणाले,
“संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांना दुसरी काही कामे आहेत का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “आपल्या सेनेने त्यांना धडा शिकवला आहे. युद्धविराम जाहीर झाला तरी त्यांना काही काम उरलेले नाही,” अशी टीका महाजन यांनी केली.

त्यांनी यासोबतच मोदी सरकारवर टीका करणाऱ्यांना उद्देशून सांगितले, मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी हास्यास्पद आहे. आपल्या देशात सक्षम सैन्य आहे, आणि बाहेरच्यांची गरज नाही.

काँग्रेसच्या दहशतवादावरील टीकेवर उत्तर देताना म्हणाले, जर काँग्रेसला दहशतवाद वाटत असेल, तर आम्ही काही सांगू शकत नाही. आजच्या काळात परिस्थिती बदलली आहे आणि तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे. त्यांनी पाकिस्तानच्या स्थितीवर भाष्य करत सांगितले, पाकिस्तानची आजची परिस्थिती काय आहे? त्यांच्याकडे खायला नाही, परंतु आपला देश वेगाने प्रगती करत आहे.

पाकिस्तानच्या अंतर्गत वादावर महाजन म्हणाले, पाकिस्तान एकसंध नेतृत्व नाही, त्यांच्यात अनेक अंतर्गत वाद आहेत. हा देश विश्वास ठरण्यासारखा नाही.

महाजन यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल नमूद करत सांगितले, युद्ध झाले पाहिजे असे नाही. आपण परिस्थिती पहात आहोत.

महाजन यांनी कुंभमेळा संदर्भात स्पष्ट केले, कुंभमेळ्यात कोणतीही दुर्व्यवस्था होणार नाही. कॅबिनेटमध्ये निधी मंजूर झाल्याने सगळ्या कामांचे नियोजन वेळेत होईल.

महाजन यांनी आगामी निवडणुकीवर टिप्पणी करत सांगितले की, आज निवडणुकीबद्दल काही सांगता येणार नाही, परंतु आम्ही महायुतीतच लढणार आहोत.

पालकमंत्री पदाबाबत मिश्किल प्रतिक्रिया
“पालकमंत्री पदावर अजूनही प्रश्न सुटला नाही का?” अशी मिश्किल प्रतिक्रिया महाजन यांनी दिली.

error: Content is protected !!