नाशिक । प्लंबिंगमधील आधुनिक माहितीचे प्रशिक्षण देऊन या प्रशिक्षणाच्या आधारावर नाविन्यपूर्ण प्रश्नमंजुषा म्हणजेच इंडियन प्लंबिंग असोसिएशनद्वारा आयोजित लीग (आयपीपीएल) असून यावर्षीच्या या प्रश्नमंजुषेमध्ये नाशिकच्या एबीएच डेव्हलपर्स संघाने विजेतेपद पटकावले.तर मुक्ता एमईपी कन्सल्टंटच्या संघास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या प्रश्नमंजुषेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला .
याप्रसंगी नरेडको नाशिकचे अध्यक्ष सुनिल गवादे, असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हील इंजिनिअर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय सानप, इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या नाशिक चॅप्टरचे अध्यक्ष विक्रम खैरनार ,उपाध्यक्ष जयंत भिंगे,सचिव अनिल अरगडे , आयपीपीएलचे संयोजक चिन्मय देशपांडे तसेच माजी अध्यक्ष मिलिंद शेटे हे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना नरेडको नाशिकचे अध्यक्ष सुनिल गवादे म्हणाले ,बांधकामांमधील बदलांनुसार प्लंबिंगचेही तंत्रज्ञान बदलत असून एआयचा वापरदेखील प्लंबिंगमध्ये येऊ घातला आहे.उंच इमारतींमध्ये सुयोग्य प्लंबिंग महत्वाचे असून या कामामध्ये सुरक्षेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नरेडको व इंडियन प्लंबिंग असोसिएशन यांनी एकत्र यावे असेही ते म्हणाले .
स्पर्धेबाबत माहिती देतांना अध्यक्ष विक्रम खैरनार म्हणाले ,हे या स्पर्धेचे 9 वे वर्ष असून सुमारे 19 संघांनी यात सहभाग नोंदवला होता.या अंतर्गत 5 आठवड्यांचे प्रशिक्षण या स्पर्धकांना देण्यात येते.यानंतर त्यांची लेखी परीक्षा घेण्यात येते.या प्रक्रियेनंतर अंतिम फेरीसाठीचे 4 संघ निवडले जातात.
असे आहेत विजेते
प्रथम-सागर अकोलकर व रोशनी कळमकर (एबीएच डेव्हलपर्स)
द्वितीय -सुनयना साळवे व तन्वी भागडे (मुक्ता एमईपी कन्सल्टंट)
तृतीय -निलेश भालेराव व किरण मोरे (रे कन्स्ट्रक्शन्स)











