फडणवीसांची उद्धव ठाकरेंना थेट ऑफर

मुंबई । राज्यसभेत आज एक अनपेक्षित आणि चर्चेचा विषय ठरलेली घटना घडली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.

सभागृहात बोलताना फडणवीस म्हणाले, आम्हाला विरोधी पक्षात जायचा स्कोप 2029 पर्यंत नाही. पण उद्धवजी, तुम्हाला इकडे (सत्तेत) येण्याचा स्कोप आहे. त्यावर विचार करता येईल. आपण वेगळ्या पद्धतीने बोलू.

या वक्तव्याला राजकीय संकेत मानत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे, या भाषणापूर्वी सभागृहाच्या बाहेर फडणवीस आणि ठाकरे यांची थोडक्यात भेटही झाली होती.

दानवे यांना सावरकर भक्त म्हणून गौरव
अंबादास दानवे यांच्या कार्यकाळाचा शेवटचा दिवस असल्याने त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी फडणवीसांनी दानवे यांचे कौतुक करताना त्यांना “कट्टर सावरकरवादी” म्हणत गौरवले.
भोंग्यांविरोधात त्यांनी निवेदनं दिली, ते सावरकरांच्या विचारांचे खंदे समर्थक आहेत, असे फडणवीस म्हणाले. तसेच, भलेही ते बंटी पाटलांच्या बाजूला बसतात, तरी ते सावरकरांचे खरे भक्त आहेत, असे नमूद करत त्यांनी त्यांच्या हिंदुत्वनिष्ठ भूमिकेचे समर्थन केले.

error: Content is protected !!