सेवेकऱ्यांनी केली वारकऱ्यांची सेवा ; समर्थ गुरुपीठाचा उपक्रम

त्र्यंबकेश्वर : अठ्ठावीस युगे भक्तांची वाट पाहणारा, या जगाचा पालक अश्या सुंदर, सावळ्या विठ्ठलाच्या भेटीची आस मनी ठेऊन शेकडो किलोमीटर काट्या कुट्यांची, दगड धोंड्यांची, डोंगर दऱ्यांची वाट तुडवत हजारो आबालवृद्ध वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे आशीर्वादाने या वारकऱ्यांची सेवा करण्यात श्री स्वामी समर्थ सेवेकरी गुंतलेले असून समर्थ गुरुपीठाच्या आरोग्य अभियान आणि सद्गुरू मोरेदादा हास्पिटलच्या वतीने राज्यभर अनेक ठिकाणी केंद्राच्या माध्यमातून वारकऱ्यांचे स्वागत करून त्यांना विविध आरोग्य सुविधा देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

गेल्या पंधरा वीस दिवसांपासून राज्यभरातून विविध ठिकाणहून दरवर्षी प्रमाणे दिंड्या पंढरपूरकडे निघाल्या आहेत. देहू व आळंदी येथून संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली तर त्र्यंबकेश्वर येथून निवृत्तीनाथ पालखीचे प्रस्थान होते. याच दरम्यान गावागावातून वारकरी आपापल्या दिंडीतून पंढरीची वाट धरतात.
हिवाळ्यात येणारी त्र्यंबकची संत निवृत्तीनाथ यात्रा व त्यानिमित्ताने येणाऱ्या दिंड्या आणि वारकरी व पावसाळ्यात येणारी पंढरी वारी. या दोन्ही प्रसंगी गुरुपीठाच्या वतीने महाप्रसाद वाटप, वृद्ध सेवेकऱ्यांच्या पायांची मालीश,आरोग्यतपासणी आणि मोफत औषधी वाटप अश्या गोष्टी केल्या जातात.असे चंद्रकांतदादा मोरे यांनी सांगितलं.

पालखी, दिंडीतील वारकऱ्यांना आरोग्य तपासणी करून औषधीपचार करण्यात आले.
आठ हजार पेक्षा अधिक वारकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. उपस्थित डॉक्टर्स व सेवेकऱ्यांनी वयोवृद्ध वारकऱ्यांची पायांची मालीश करून त्यांचा थकवा दूर केला. महाप्रसाद वाटपही झाले.

गुरुपीठाच्या वतीने डॉ. सचिन रोटे ,प्रदीप औताडे, राजन राऊळ ,जालिंदर औताडे, तायडे ,गुंबाडे,रवींद्र औताडे, डॉ. निलेश औताडे यांच्या सह 225सेवेकऱ्यांनी या सेवाकार्यात सहभाग घेतला

error: Content is protected !!