नाशिक | श्वास फाउंडेशनचे अध्यक्ष , निष्ठवान , संयमी आणि विकासाभिमुख नेतृत्व असलेले भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते प्रदीप पेशकार यांचा आज वाढदिवस. यानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार, (दि.२०) एप्रिल रोजी संध्याकाळी ६.३० ते ९ या वेळेत त्र्यंबक रोडवरील अखिल ब्राह्मण मध्यवर्ती कार्यालयात संपन्न होणार आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते, समाजसेवा हाच ‘श्वास’ समजून विकासासाठी झटणारे नेतृत्व म्हणून प्रदीप पेशकार यांनी समाजात आपल्या कार्यकर्तृत्वाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. 1992 पासून त्यांनी भारतीय जनता पार्टीचे काम सुरू केलं. 1998 मध्ये लघुउद्योग भारतीचा काम त्यांनी सुरू केलं. या माध्यमातून त्यांनी उद्योजकांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पाठपुरावा केला. त्यांच्यातील नेतृत्व, कोणताही प्रश्न तडीस नेण्यासाठी त्यांची धडपड या गुणांमुळे 2010 साली भाजप उद्योग आघाडीचे सरचिटणीस म्हणून त्यांचे नियुक्ती करण्यात आली.
पक्षाची ध्येय, धोरण यांचा सखोल अभ्यास असल्याने पक्षाच्या प्रवक्ते पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. संघाचे बाळकडू आणि भाजपचे संस्कार त्यांच्या ठाई आहेत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या मुद्रा, स्टार्टअप, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत या योजनांच्या प्रचारासाठी 300 पेक्षा अधिक कार्यशाळा घेत त्यांनी युवकांना उद्योजकतेचे धडे दिले. युवकांनी उद्योजक व्हावे याकरता शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. ‘श्वास’ फाउंडेशनचे काम करत असताना या फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांची आरोग्यसेवा करण्याबरोबरच या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत आहेत.
उद्योजकांचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्याचा पाठपुरावा करत ते सोडवण्याची चिकाटी त्यांच्या ठायी असल्याने एक विकासाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. समाजसेवा हा तर त्यांचा ‘श्वास’ च म्हणावा लागेल.राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम ते करत असतात.
या कार्यक्रमासाठी सर्व मित्रपरिवार, सहकारी व नागरिकांनी उपस्थित राहून अभिष्टचिंतन सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.










