कुंभ बैठकीवरून वाद, खासदारांना डावलल्याने शिवसेना आक्रमक

नाशिक । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत नाशिकमध्ये झालेल्या कुंभ बैठकीत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांना बोलावण्यात न आल्याने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकार्‍यांना याबाबत निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक मध्ये कुंभमेळा बैठक पार पडली. बैठकीला शिष्टाचारानूसार नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांना निमंत्रण देणे क्रमप्राप्त होते. परंतू खासदार हे उध्दव ठाकरे गटाचे असल्याने पक्षपातीपणा केला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

कुंभमेळा हा नाशिक लोकसभा मतदारसंघात होत असतो आणि या लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे हे लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांनाच शासनाकडून कुंभमेळ्याच्या बैठकीला बोलवले जात नाही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

यापुढे अशा प्रकारचा अवमान सहन केला जाणार नाही असा इशाराच यावेळी देण्यात आला. यावेळी शिवसेना उपनेते सुनिल बागुल, सह संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी.जी.सूर्यवंशी, राज्य संघटक विनायक पांडे,महानगरप्रमुख विलास शिंदे, वसंत गिते, केशव पोरजे,भारती ताजनपूरे, राहूल ताजनपुरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!