काँग्रेसला झटका, पदाधिकार्‍यांचा शिंदे सेनेत प्रवेश

नाशिक । काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत भगवा हाती घेतला. मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रदेश काँग्रेस ओबीसी सेनचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नाथपंथी गोसावी समाज विकास मंडळाचे प्रदेशाध्यक्ष संतोष नाथ यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

नाथपंथी गोसावी समाज विकास मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत पाठींबा दिल्याने नाशिकमध्ये शिंदे गटाची ताकद निश्चितपणे वाढणार आहे.

संतोष नाथ यांनी काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम केले. काँग्रेसच्या व्हीजेएनटी विभागाचे प्रदेश सरिचटणीस त्यांनंतर उपाध्यक्षपद त्यांनी भूषवले. ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस ते उपाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली. समाजाच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी पक्षाच्या माध्यमातून विविध आंदोलने केली.

संघटन कौशल्य आणि समाजाच्या प्रश्नांची त्यांची तळमळ पाहता त्यांना पक्षात विविध पदांवर बढती देण्यात आली. नाथपंथीय समाजाच्या विविध प्रश्नांवर त्यांचा नेहमी पुढाकार असतो.

काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसच्या आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे नाथ आता कोणत्या पक्षात प्रवेश करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत भगवा हाती घेतला.

यांचा झाला प्रवेश
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाचे कार्याध्यक्ष अतुल वंजारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव महेश कांबळे, काँग्रेसचे चेंबरचे माजीनगरसेवक शैलेश धिवर, दक्षिण मध्य मुंबई काँग्रसचे उपाध्यक्ष संतोष लोखंडे, दक्षिण मध्य मुंबई शिवसेनेचे समन्वयक सतिश वाघमारे, नवी मुंबई शिवसेनेचे समन्वयक सुर्यकांत वाघमारे, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा शिवसेना समन्वयक कैलास आरवडे, नाथपंथी गोसावी समाज प्रदेश संघटक सचिन खरे, प्रदेश सह संघटक महेश खरे, रतीलाल यीशी, अभिजीत पवार, वैभव कांबळे, अमित खोलसे


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेले काम, राबविलेल्या योजनांमुळे राज्य विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नाथपंथी गोसावी विकास मंडळाने शिंदे गटात प्रवेश केला. आगामी काळात केवळ नाशिकच नव्हे तर संपूर्ण राज्यात शिंदे गटाची ताकद वाढणार आहे.
संतोष नाथ, प्रदेशाध्यक्ष नाथपंथी गोसावी समाज विकास मंडळ

error: Content is protected !!